फॉरेन्सिक अकाउंटिंग : करिअरची एक नवी दिशा
क्षितिजा राहुल सोमण
Accounting, legal आणि investigative अशी सर्व प्रकारची कौशल्ये एकत्र वापरून न्यायालयात सादर करता येईल असा ठोस पुरावा शोधणे वा मिळविणे म्हणजे "फॉरेन्सिक अकाउंटिंग.' येत्या तीन वर्षांत सुमारे सोळा हजार फॉरेन्सिक अकाउंटंट्सची गरज आपल्याला भासणार आहे.
वाणिज्य शाखेकडे गेल्या दोन दशकांत विद्यार्थ्यांचा ओढा वेगाने वाढला आहे. त्यापूर्वी हुशार विद्यार्थी इंजिनिअर किंवा डॉक्टरच होणार हे ठरलेले असायचे; परंतु गेल्या काही वर्षांत उद्योग- व्यवसायांना चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भारतासाठी खुली झाली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचीही झपाट्याने प्रगती झाली. या साऱ्याचा परिणाम म्हणून CA, CWA, CS सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे हुशार विद्यार्थी आकर्षित होऊ लागला. नाइलाज म्हणून नव्हे, तर जाणीवपूर्वक तो वाणिज्य शाखेचा पर्याय चोखाळू लागला.
Detailed article on Riskpro
Insurance Fraud Research covered widely
13 years ago
No comments:
Post a Comment